Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घोडीचा बर्थडे! दिले 700 पाहुण्यांना जेवण!

घोडीचा बर्थडे! दिले 700 पाहुण्यांना जेवण!
, सोमवार, 4 जुलै 2022 (07:42 IST)
हिंगोली: आपण आपल्या मित्रांचे किंवा घरातील व्यक्तींचे वाढदिवस मोठ्या उत्साहात थाटामाटात साजरे करतो. पण काही प्राणी प्रेमी मंडळी आपल्या पाळीव प्राण्यांचा देखील वाढदिवस साजरा करतात. अशीच एक घटना घडली आहे हिंगोली जिल्ह्यात. हिंगोली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क आपल्या घोडीचा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला आहे. त्यामुळे या वाढदिवसाची चर्चा संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात होत आहे. हिंगोली जिल्ह्यात एका अश्वप्रेमीने आपल्या वैष्णवी (Vaishnavi)नावाच्या घोडीचा वाढदिवस थाटामाटात साजरा केला आहे. हिंगोली येथून जवळ असलेल्या वरुड गवळी (Varud Gavali) या गावातील शेतकरी अक्षय राजेश बेंगाळ (Akshay Rajesh Bengal)यांना अश्व पाळण्याचा चांगलाच छंद आहे. या अक्षय राजेश बेंगाळ नावाच्या अश्वप्रेमीने आपल्या घोडीचा वाढदिवस साजरा केला आहे. काल (दि. 1 जुलै) रोजी आपल्या वैष्णवी नावाच्या घोडीचा सहावा वाढदिवस या शेतकऱ्याने साजरा केला.
 
या वाढदिवसासाठी पाहुण्यांनी चांगलीच गर्दी केली होती. वाढदिवसासाठी जवळपास 600 ते 700 पाहुण्यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पाहुण्यांना गोडधोड जेवण देखील करण्यात आले होते. वैष्णवीच्या वाढदिवसाची चर्चा मात्र संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात रंगली होती. वैष्णवी नावाच्या घोडीच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बॅनर देखील लावण्यात आले होते. अक्षय राजेश बेंगाळ हे अश्वप्रेमी असून, त्यांच्याकडे चार घोडी आहे. या घोडींची किंमत लाखांच्या घरात आहे. तसेच अक्षय बेंगाळ लग्नासाठी सुपारी देखील घेतात. यासाठी ते हजारांच्या घरात पैसे घेतात.
 
या घोडींच्या माध्यमातून अक्षय राजेश बेंगाळ यांना वर्षाकाठी लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. त्यांना एका वर्षाला जवळपास दहा लाख रुपयांची कमाई या माध्यमातून होते. तसेच अक्षय राजेश बेंगाळ यांच्याकडे शेती देखील असून, ते दोन भाऊ आहेत. मात्र, अक्षय बेंगाळ यांच्या ह्या आगळ्यावेगळ्या कृत्याची संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक: उघड्या डीपीमुळे आठ वर्षीय बालकाचा मृत्यू.