Hanuman Chalisa : मागील काही दिवसांत हनुमान चालिसावरून राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. नवनीत राणा यांच्याकडून सतत हनुमान चालिसावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.
त्यातच, लोकसभेतील अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा खासदार श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा वाचवून दाखवत ठाकरे गटावर निशाणा साधला होता. दरम्यान, राणा आणि शिंदे यांच्या याच टीकेला ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एकाचवेळी उत्तर दिले आहे. राणा यांच्या अमरावतीत बोलतांना, हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले? असा खोचक टोला अंधारे यांनी लगावला आहे.
आपण कधीच विचार करत नाही, हनुमान चालिसा म्हटली म्हणजे म्हटली. श्रीकांत शिंदे यांनी हनुमान चालिसा म्हटली, हो म्हटली. पण, हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले? आहेत. जर हनुमान चालिसा म्हटल्याने श्री सदस्य यांचा चेंगराचेंगरीत मृत्यू झाला, ते जिवंत होत असतील तर मीरोज सकाळ, संध्याकाळी, रात्री दिवसभरात हनुमान चालिसाम्हणत राहिल. जर हनुमान चालिसा म्हटल्याने समृद्धी महामार्गावर गेलेले २७ जीव परत येत असतील तर निश्चितच आम्ही सर्व हनुमान चालिसा म्हणायाला तयार आहोत. कुठली गोष्ट कुठे नेतायत. लोकप्रतिनिधी यांनी लोकांची प्रश्न मांडली पाहिजे, असे असतांना ते प्रश्नच मांडले जात नाही. पक्षाचे राजकारण सोडून द्या. प्रत्येकवेळी जाहिरातीसारखं बोलायची गरज नाही.