Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संजय राऊत यांच्याकडे संपत्ती किती आहे?

sanjay raut
, सोमवार, 1 ऑगस्ट 2022 (23:17 IST)
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयानं 4 ऑगस्टपर्यंत ईडीची कोठडी सुनावली आहे.
 
पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी संजय राऊतांवर ईडीनं कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे आता राऊतांच्या संपत्तीचा आकडा नेमका किती, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
 
दीड महिन्यापूर्वी राज्यसभेच्या उमेदवारीसाठी अर्ज भरताना संजय राऊत यांनी आपली संपत्ती जाहीर केली होती.
 
त्यानुसार, संजय राऊत यांच्याकडे एकूण 8 कोटी 25 लाखांची स्थावर मालमत्ता आहे. तर त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची स्थावर मालमत्ता 7 कोटी 27 लाख इतकी आहे.
 
स्थावर मालमत्ता सोडून संजय राऊतांची एकूण संपत्ती 2 कोटी 21 लाख इतकी आहे. तर वर्षा राऊत यांची 96 लाख 79 हजार इतकी आहे.
 
संजय राऊत यांच्या संपत्तीचा तपशील
राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरताना संजय राऊत यांनी दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडील संपत्तीविषयीची माहिती सांगितली आहे. त्यानुसार -
 
संजय राऊत यांच्याकडे 1 लाख 7 हजार 885 रुपये रोकड आहेत. तर त्यांच्या बँक खात्यात 1 कोटी 62 लाख 97 हजार 360 रुपये आहेत.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याकडे 729 ग्रॅम सोनं आहे. या दागिन्यांची किंमत 39 लाख 59 हजार 500 रुपये इतकी आहे.
वर्षा राऊत यांच्याकडे 1820 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आहेत. त्यांची किंमत 1 लाख 30 हजार रुपयांच्या आसपास आहे.
स्थावर मालमत्ता सोडून संजय राऊतांची एकूण संपत्ती 2 कोटी 21 लाख इतकी आहे. तर वर्षा राऊत यांची एकूण संपत्ती 96 लाख 79 हजार इतकी आहे.
संजय राऊत यांची स्थावर मालत्ता
संजय राऊत यांच्या नावावर अलिबागमध्ये 3 शेतजमिनी असून त्यांची सध्याची किंमत 4 लाख 34 हजार रुपये इतकी आहे.
तर वर्षा राऊत यांची पालघरमध्ये 0.74 एकर जमीन असून तिची किंमत 9 लाख रुपये आहे.
संजय राऊत यांनी 2001-02 मध्ये 1 लाख 90 हजारांना बिगरशेतमीन विकत घेतली. त्याची आजची किंमत 2 कोटी 20 लाख इतकी आहे.
वर्षा राऊत यांनी विकत घेतलेल्या जमिनीची सध्याची किंमत 1 कोटी 46 लाख एवढी आहे.
संजय आणि वर्षा राऊत यांचं दादरमध्ये प्रत्येकी एक घर आहे. भांडूप आणि गोरेगावमध्ये संजय राऊत यांचं एक घर आहे.
संजय राऊत यांच्याकडे एकूण स्थावर मालमत्ता 8 कोटी 25 लाख आहे. तर वर्षा राऊत यांची स्थावर मालमत्ता 7 कोटी 27 लाख इतकी आहे.
राऊत दाम्पत्यावरील कर्ज
संजय राऊत यांच्यावर 1 कोटी 71 लाखांचं देणं अद्याप बाकी असून वर्षा राऊत यांच्यावर 1 कोटी 67 लाखांचं देणं बाकी आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

CWG 2022 Day 4 Live Updates:जुडोका सुशीला देवी सुवर्णपदकाचा सामना हरली, रौप्यपदकावर समाधान मानावे लागले, विजयने कांस्यपदक जिंकले