Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ? राज्यात पुढचे ४ दिवस पावसाचे

अरबी समुद्रात पुन्हा चक्रीवादळ? राज्यात पुढचे ४ दिवस पावसाचे
, गुरूवार, 18 नोव्हेंबर 2021 (07:31 IST)
अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याचा मोठा परिणाम, महाराष्ट्राच्या किनारपट्टीसह राज्याच्या अनेक भागांवर होणार आहे. परिणामी, येत्या रविवारपर्यंत (२१ नोव्हेंबर) राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस होण्याचा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. हवामानशासात्र विभागाचे शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी म्हटले आहे की, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीमध्ये द्रोणीय स्थिती तयार झाली आहे. परिणामी किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण राहणार आहे.हे कमी दाबाचे क्षेत्र येत्या ४८ तासात किनारपट्टीपासून दूर जाऊन अजून दाट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या आजपासून येत्या २१ नोव्हेंबरपर्यंत राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अशा प्रकारे PM Jandhan Account उघडा, सरकार 1.3 लाख रुपयांची मदत करेल