Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पत्नीच्या सन्मान सोहळ्यात पतीचा मृत्यू

vikas mahajan
, शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (10:23 IST)
यवतमाळ- काळजाचा ठोका चुकावणारी घटना यवतमाळमध्ये घडली आहे. येथे प्राचार्य पदावरून सेवानिवृत्त झालेल्या पत्नीचा सत्कार सोहळ्यात पतीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे पत्नीला मोठा धक्का बसला आहे तसेच संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. विकास महाजन असे मृताचे नाव आहे.
 
गुरुवारी दुपारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात अत्यंत उत्साहात सोहळा सुरू असतानाच अचानक त्यांच्या पतीला भोवळ आली आणि सर्वांच्या डोळ्यादेखत त्यांचे निधन झाले. उपस्थित सर्वांचे मन हेलावून टाकणारा हा प्रसंग घडल्यानंतर खळबळ उडाली.
 
विकास महाजन यांच्या पत्नी डॉ. रेखा महाजन या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत प्राचार्य होत्या. 31 मार्च रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. या निमित्त कर्मचाऱ्यांनी गुरुवारी त्यांचा निरोप समारंभ आयोजित केला असताना डॉ. रेखा महाजन व त्यांचे पती निवृत्त कृषी अधिकारी विकास महाजन या दोघांच्या हस्ते जिल्ह्यातील पीचएडी प्राप्त शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
 
या कार्यक्रमात विकास महाजन यांनी भाषण केले आणि नंतर मंचावर बसलेले असतानाच अचानक भोवळ येऊन खाली कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मावळली. 
 
कार्यक्रमाला महाजन दाम्पत्याच्या दोन मुली, मुलगा कार्यक्रमाला उपस्थित होते. तसेच त्यांची नातवंडेही आली होती. मात्र या घटनेमुळे संपूर्ण महाजन परिवार शोकसागरात बुडाला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना नेते यशवंत जाधव यांची मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त