Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ज्युलिओ रिबेरो म्हणतात, या वयात मी कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकत नाही

ज्युलिओ रिबेरो म्हणतात, या वयात मी कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकत नाही
, मंगळवार, 23 मार्च 2021 (08:26 IST)
राज्याचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या पत्राच्या आणि गंभीर आरोपाची चौकशी माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी करावी असे म्हटले होते. यावर माजी आयपीएस अधिकारी ज्युलिओ रिबेरो यांनी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर प्रकरणाची चौकशी करण्यास नकार दिला आहे. रिबेरो यांनी म्हटले आहे की, मला या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज नाही. या प्रकरणात अद्याप कोणा विषयीही कोणासोबत चर्चा देखील केली नाही, परंतु शरद पवार यांनी मला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे असे मी ऐकले आहे. त्यांनी आपले वय सांगितले आणि म्हणाले की मी आता ९२ वर्षांचा आहे. या वयात मी कोणत्याही प्रकरणाची चौकशी करू शकत नाही. माझ्याकडे इतकी शक्ती नाही.
 
तसेच रिबेरो पुढे म्हणाले की, माझ्यामध्ये सामर्थ्य असले तरी मी अशा प्रकरणाची चौकशी केली नसती”. कारण हे अगदी खालच्या पातळीवरचे राजकारण आहे. ते म्हणाले की, परंबीरसिंग यांना जेव्हा ही माहिती मिळाली तेव्हा त्यांनी या प्रकरणाला वाचा फोडायला हवी होती. बदली झाल्यावर ते असे आरोप करीत आहेत. अशा प्रकारच्या पत्रे लिहिणे हे एखाद्या पोलिस अधिकाऱ्याचे काम नाही.
 
परमबीर सिंह यांच्या पत्रावर तुमचा विश्वास आहे का असे रिबेरो यांना विचारले असता. रिबेरो यांनी म्हटले आहे की, अशा अधिकाऱ्यांवर आणि राजकारण्यांवर माझा विश्वास नाही. त्यांना खोटे बोलण्याची सवय आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

खेळत असलेल्या लहान मुलावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला