Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘हे बघण्यापेक्षा मी मेलो असतो..’उदयनराजे सर्वांसमोर रडले

udyan raje bhosale
, सोमवार, 28 नोव्हेंबर 2022 (21:17 IST)
छत्रपती शिवाजी महाराज  यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले. दरम्यान आज खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषद घेत. शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर निशाना साधला. यावेळी आपली भूमिका मांडत, महापुरुषांचा अपमान केल्याबद्दल त्यांना देशद्रोहाची शिक्षा करावी अशी मागणी त्यांनी केली. यावेळी उदयनराजे भोसले भावूकही झाले होते. यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असतं, असं बोलताना त्यांचे डोळे पाणावले होते.
 
राज्यपालांच्या विधानावर शिवप्रेमी संघटनांशी  चर्चा केल्यानंतर उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सर्व पक्षांना आणि पक्षश्रेष्ठींना संतप्त सवाल केले. महाराजांचं नाव घेता मग त्यांची अवहेलना कशी सहन होते. असा खडा सवाल त्यांनी केला.
 
“ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वधर्म समभावाचे विचार दिले त्या शिवरायांना सर्व पक्ष आदर्श मानतात. मात्र महाराजांबद्दल गलिच्छ प्रतिमा तयार केली जाते, तेव्हा राग कसा येत नाही ? याबद्दल जनतेने विचार करणे गरजेचे आहे. यामुळे पुढच्या पिढीसमोर चुकीचा इतिहास जाईल. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना देशद्रोहाची शिक्षा व्हावी. बोलताना सुद्धा वाईट वाटत हे ऐकण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असत. अपमान करणाऱ्यांवर कारवाई करू शकत नसाल तर कोणालाही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही. पक्षश्रेष्ठींनी अशा लोकांवर कारवाई करण्याची अपेक्षा आहे. अधिकृत इतिहास मांडला नाही. पण निवडणुका आल्या की ‘शिवाजी महाराज की जय.’ शिवाजी महाराजांची अवहेलना करणं पुढील काळात लोकांना फॅशन वाटेल. ज्या राजेंनी मोकळा श्वास घेण्यास हे राज्य दिलं त्या राजेंची अवहेलना झाल्यानंतर लोकशाहीतले राजे कधी जागे होणार ? की असच सहन करत बसणार,” असा संतप्त सवाल उदयनराजेंनी केला आहे.
 
“महाराजांबरोबर अपमानजनक वक्तव्य केले गेले, बोलताना सुद्धा वाईट वाटत. हे ऐकण्यापेक्षा मेलो असतो तर बरं झालं असत,’ असं बोलताना उदयनराजे भावनिक झाले. त्यांना अश्रू अनावर झाले होते. दरम्यान या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार असल्याचही उदयनराजेंनी सांगितलं. तसेच ३ डिसेंबर रायगडावर धरणे आंदोलन करणार असल्याची देखील माहिती आज झालेल्या पत्रकार परिषदेत उदयनराजेंनी दिली. रायगडावर जाऊन लोकांच्या भावना व्यक्त करणार असंही ते म्हणाले.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मोठी बातमी ! राज्यपाल कोश्यारींची पदमुक्त होण्याची इच्छा ?