महाराष्ट्रात भोंगे हटवण्यावरुन राजकारण तापलं आहे. राज्यातील मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी कोणी आले तर आमच्या पक्षाचे कार्यकर्ते त्याला विरोध करतील असे वक्तव्य रिपाई अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
मशिदींवरील भोंगे काढण्यासाठी जर कोणी आले तर आम्ही संरक्षण करु असे रिपाई अध्यक्ष रामदास आठवले म्हणाले आहेत. आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेचा विरोध करतो आहे. भोंग्यांवरुन राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यामध्ये आता रामदास आठवलेंनी विरोधी भूमिका घेतल्यामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. मुस्लिम समुदायाला शांततेची भूमिका घेण्याचे आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.
दरम्यान मुस्लिम समाजात काही मौलानांकडून चिथावणीखोर वक्तव्य करण्यात येत आहे. यामुळे समाजातील चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या मौलानांनी शांत राहिले पाहिजे. उलटसुलट बोलून त्यांनी आपल्या समाजावर संकट ओढावून घेऊ नये असे रामदास आठवलेंनी सांगितले आहे.