राज्यात कोरोनाची लाट ओसरत आहे. सध्या कोरोनाचे प्रकरण देखील कमी होत आहे. सध्या गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे मृत्युमुखी होण्याच्या संख्येत देखील घट आली आहे. कोरोना बाधितांची आणि सक्रिय रुग्णसंख्या कमी झाल्याचे समाधान आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केले आहे.
जालन्यात पत्रकारांनी कोरोनाची चौथी लाट येणार का ? असं विचारल्यावर त्यांनी राज्यातील लसीकरण न केलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. अशी मी विनंती करतो. सध्या जरी कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली असली तरी ही राज्याला चोथ्या लाटेपासून वाचण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक आहे. नागरिकांनी आपल्या कर्तव्याचे पालन करून लसीकरण बाबतीत जागरूकता दाखवावी. आपण लसीकरण घेऊन आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी आणि कोरोनाचा वाढत्या संसर्गाला दूर करावे. जेणे करून कोरोनाच्या चौथ्या लाटेचा धोका टाळता येईल. त्यासाठी सर्वानी लसीकरण करणे आवश्यक आहे. असे ते म्हणाले.