Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

…तर मी भर चौकात फाशी घेईन”; संतोष बांगर यांचं चॅलेंज

santosh bangar
, गुरूवार, 11 जानेवारी 2024 (21:05 IST)
हिंगोलीतील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात सापडत असल्याचं पाहायला मिळत आहे. संतोष बांगर आणि वाद काही नवा नाही. ते अनेकदा वादात अडकले आहेत. पण आता संजय बांगर वादात नाहीत, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आले आहेत.
 
दरम्यान  2024 च्या निवडणुकीत पंतप्रधान मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर भरचौकात फाशी घेईल, असे चॅलेंज संतोष बांगर यांनी दिलं आहे.  याआधीही त्यांनी मिशी काढण्याचं चॅलेंज दिलं होतं. त्यावेळी त्यांची चर्चा झाली होती. आता मोदी पंतप्रधान झाले नाहीत, तर फाशी घेईल, असे बांगर म्हणाले आहेत.
 
काय म्हणाले संतोष बांगर -
कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर नेहमीच या ना त्याकारणाने चर्चेत असतात. आज त्यांनी एक नवीन चॅलेंज केलं आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीच होणार आहेत. तसे झाले नाही तर स्वतः भर चौकात फाशी घेणार असल्याचे चॅलेंज आमदार संतोष बांगर यांनी केलं आहे. संतोष बांगर यांच्या नव्या चॅलेंजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

स्वच्छ राज्यांच्या यादीत महाराष्ट्र ठरलं पहिल्या क्रमांकाचं राज्य; हे’ शहर तिसऱ्या क्रमांकावर