ग्रामीण पोलीस कल्याण अंतर्गत विविध उपक्रमांचं आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान याचवेळी राज्यातील वेगवेगळ्या मुद्यांवर बोलत असताना त्यांनी ST कर्मचाऱ्यांच्या संपावर देखील भाष्य केलं. कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगा एवढा पगार मिळेल, संप मागे घ्या असं आवाहन केलं.
एसटी खासगीकरणाचा सध्या कुठलाही विचार सुरु नाही, पण एसटी कर्मचाऱ्यांनी 31 मार्चपर्यंत संप मागे घ्यावा असं अजित पवारांनी म्हटलं. एसटी कर्मचाऱ्यांना मोठी पगारवाढ दिली असून वेळेत पगार होतील. एसटीचा प्रश्न सुटलेला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना शेवटची संधी आहे. ३१ मार्चपर्यंत संप न मिटल्यास कारवाई होईल असे आवाहन देखील अजित पवारांकडून करण्यात आले आहे.