"आम्हाला 20 आमदार कमी पडले आणि आम्हाला सर्व ठिकाणी धोका झाला, आम्ही धोका दिला असता तर शिवसेनेच्या 5 जागाही आल्या नसत्या," अशा शब्दांत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.
देगलूर विधानसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीसाठीचं वातावरण तापायला लागलं आहे. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना देगलूरमध्ये रिंगणात उतरवलं आहे.
यावेळी झालेल्या भाजप मेळाव्यामध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली.