सध्या पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. राज्यात पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, आणि सातारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने या जिल्ह्यांत मुसळधार ते अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. कारण नसताना कोणीही घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे.
भारतीय हवामान खात्यानं ठाणे जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी येथे मध्यम ते हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 28 ते 30 जुलै दरम्यान राज्यातील कोणत्याही जिल्ह्यासाठी कोणतेही अलर्ट जारी केले नाही.