Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महत्वाची बातमी, बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या

महत्वाची बातमी, बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या
, बुधवार, 15 जुलै 2020 (22:23 IST)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळ अर्थात महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या १६ जुलै रोजी जाहीर होणार आहे. हा निकाल तुम्ही www.mahresult.nic.in, www.hscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या संकेतस्थळावर दुपारी १ वाजल्यापासून पाहता येणार आहे.
 
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल १६ जुलैला जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर दुपारी १ वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
 
राज्य मंडळाच्या मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती. संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकालाबरोबरच अन्य सांख्यिकी माहितीही उपलब्ध होणार आहे. निकालाच्या दुसर्‍या दिवसांपासून परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यास विषयांमध्ये त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे http://verification.mh-hsc.ac.in या मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करता येईल. त्याचप्रमाणे शाळा आणि ज्युनियर कॉलेजमध्येही अर्ज करता येणार आहे. गुणपडताळणीसाठी १७ ते २७ जुलैपर्यंत छायाप्रतीसाठी १७ जुलैपासून ५ ऑगस्टपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत.
 
उत्तरपत्रिकेचे मूल्यांकनासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळाल्यापासून पाच दिवसांत विहित नमून्यात शुल्क भरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहिल. तसेच परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेंतर्गत उपलब्ध राहतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

लॉक डाउन: लॉक डाउन नंतर वाढत असलेली गुन्हेगारी, या 10 प्रकाराच्या खबरदारी घ्या..