Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना मदत जाहीर

bus accident
, शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (14:47 IST)
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्र्यांनी नाशिक विभागीय आयुक्त तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून याविषयी अधिक माहिती घेतली. या अपघातात आत्तापर्यंत दहा जण ठार झाले असून काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना तातडीने शिर्डी, नाशिक या ठिकाणी हलवून त्यांच्यावर योग्य ते उपचार सुरू करावेत तसेच हा अपघात नेमका कशामुळे झाला त्याची चौकशी करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी-पाथरे गावांच्या दरम्यान सिन्नर-शिर्डी राज्य मार्गावरील ज्ञानेश्वर मंदिराजवळ पहाटेच्या सुमारास  खासगी आराम बस आणि ट्रकची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात खाजगी बस आणि ट्रकचा चक्काचूर झाला असून या १० जणांचा मृत्यू झाला आहे.
 
यात दोन पुरुष, सहा महिला तर दोन चिमुकल्यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या अपघातात खासगी बसमध्ये ३५ ते ४५ प्रवासी असल्याची प्रवास करत होते.
साई दर्शनासाठी जात होते प्रवासी
 
मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ येथील सद्गुरू पॅकेजिंग कंपनीतर्फे कामगार आणि कुटुंबियांना एकूण १५ बसमधून दर्शनासाठी शिर्डी येथे नेले जात होते. त्यातील पाचव्या क्रमांकाच्या बसला अपघात झाला. कल्याण येथील गाईड ट्रॅव्हल कंपनीची ही बस आहे. बस सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील ईशान्येश्वर मंदिराच्या कमानीजवळ आली असता ट्रकशी समोरासमोर धडक होऊन बस उलटली. अपघात इतका भीषण होता की, बसची एक बाजू पूर्णत: कापली गेली. यामध्ये १० प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ३४ हून अधिक प्रवासी जखमी झाले. स्थानिक ग्रामस्थांसह वावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे.
 
मृतांची ओळख पटण्यास विलंब
शिर्डीकडे मार्गस्थ होताना रस्त्यात हॉटेलमध्ये थांबलेल्या काही प्रवाशांनी बसमध्ये अदलाबदल केली होती. त्यामुळे मृतांची ओळख पटण्यास विलंब लागत आहे. सकाळपर्यंत मृतांमधील सहा जणांची ओळख पटली असून ते उल्हासनगर आणि अंबरनाथ येथील रहिवासी असल्याचे नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सांगितले.
 
अपघातातील जखमी प्रवासी
निधी उबाळे (९), माया जाधव (३५), प्रशांत मेहती (३५), सिमा लोले (४०), सपना डांगे (२८), हर्षद वाडेकर (१४), धनिशा वाडेकर (सहा), श्रविण्या वारकर (पाच), आशा जयस्वाल (४३), जिगर कहर (१३), बबलीदेवी कहर (३३), योगिता वाडेकर, रंजना कोठले (४०), सुप्रिया बाहीहीत, क्षुणिका गोंधळे (४२), वर्षाराणी बेहेरा (३१) हे जखमी झाल्याची माहिती यंत्रणेकडून देण्यात आली. त्यातील तीन जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.
Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्रेन पकडताना पाय घसरला