Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

‘फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो’ – संजय राऊत

sanjay raut
, सोमवार, 14 नोव्हेंबर 2022 (07:47 IST)
मुंबई – एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे नाराज असल्याची माहिती समोर येत असताना आता स्वतः सुहास कांदे यांनीच आपण नाराज असल्याचे स्पष्ट केले आहे. नाशिक जिल्ह्यात पदाधिकारी नियुक्तीवरून शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी दोन दिवसांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला असला तरी त्यांचे सुपुत्र अमोल कीर्तिकर हे ठाकरे गटामध्येच आहेत. म्हणजे शिंदे गटांमध्ये देखील मतभेद आहेत, असे दिसून येते. आज संजय राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेतली. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडताना एकनाथ शिंदे आणि समर्थक यांच्यावर निशाणा साधला आहे.
 
राऊत म्हणाले की, कोणता गट काय मत व्यक्त करतो त्यात मला पडायचे नाही. पण महाराष्ट्रात मध्यावधी निवडणूकीची तयारी सुरू झाली आहे. ते म्हणजे (शिंदे गट म्हणतात) हा आमच्याबरोबर आहे, तो आमच्याबरोबर आहे, मात्र त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात एक शिंदे कायम असतो, हे लक्षात घ्या, असे विधान ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी केले आहे. राऊत यांनी थेट शिंदे गट फुटणार असल्याचे स्पष्टपणे म्हटल्याने खळबळ उडाली आहे.
 
खासदार राऊत आणखी म्हणाले की, कोणता गट काय मते व्यक्त करतो, त्यात मला पडायच नाही. पण राज्यात मध्यावधीची तयारी सुरू झाली आहे. तसेच त्यांच्या गटातच मोठी फूट पडण्याची तयारी सुरू झाली आहे. फुटीरांच्या प्रत्येक गटात ‘एक शिंदे ‘ ( बंडखोर ) कायमच असतो हे लक्षात घ्या, असेही ठाकरे गटाचे खासदार राऊत यांनी म्हटले. तसेच खासदार राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी राऊत यांनी अमोल कीर्तिकर यांचे कौतुक केले आहे. अमोल कीर्तिकर हे आदित्य ठाकरे यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासात राहिलेले कडवट शिवसैनिक असून ते शिवसेनेसोबत आहे. आता ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. याचा आम्हाला आनंद आहे, असेही राऊत म्हणाले आहेत.

Edited by : Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

१ कोटी रुपये रोख… ६० तोळे सोने….. लाचखोर तहसिलदाराकडे सापडले मोठे घबाड