सध्या महाराष्ट्रात मुलांच्या शाळेची वेळ प्राथमिक शाळा वर्ग सकाळी आणि माध्यमिक शाळांचे वर्ग दुपारी भरवले जातात. आता शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी शाळाच्या वेळा बदलण्याची घोषणा विधिमंडळात केली. महाराष्ट्रात प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळी भरतात. या गटात 3 ते 10 वर्षांचे मुले असतात.
या मुलांच्या सकाळी शाळा असंल्यामुळे त्यांची झोप पूर्ण होत नाही. या साठी या मुलांच्या शाळेच्या वेळ बदलण्याच्या सूचना शिक्षणतज्ज्ञांकडून केल्या जात होत्या. प्राथमिक वर्गच्या शाळा दुपारी आणि माध्यमिक वर्गांच्या शाळा सकाळी व्हावा.या बाबत राज्यपाल रमेश बैस यांनी सूचना केली आहे. आता प्राथमिक शाळांचे वर्ग इयत्ता दुसरी पर्यंत शाळांची वेळ सकाळी नऊ वाजे नंतरची असणार. इतर वर्गांसाठी निर्णय घेण्यासाठी समिती स्थापणार अशी माहिती शिक्षण मंत्री दीपक केसकर यांनी दिली.