Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबईत अल्पवयीन मुलाने स्कुटरने दुचाकीला धडक दिली एकाचा मृत्यू

death
, शुक्रवार, 24 मे 2024 (09:25 IST)
पुण्यातील कल्याणीनगर भागातील पोर्श कार ची घटना ताजी असताना मुंबईत माझगाव मध्ये नेसबीट पुलावर गुरुवारी सकाळी एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने स्कुटरने एका दुचाकीला धडक दिली.या अपघातात 32 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे.

तर मुलाला डोंगरी येथे बालगृहात पाठवण्यात आले असल्याचे एका वृत्तानुसार समजले आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटवली असून इरफान शेख असे त्याचे नाव आहे. मयत इरफान पीडी मेलो रोड रहिवासी होता. 

इरफान नाश्ता करण्यासाठी घरातून बाहेर पडले असताना 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने घराचे सामान आणण्यासाठी वडिलांची दुचाकी घेऊन आला आणि गुरुवारी सकाळी 7:15 च्या सुमारास आपापल्या दुचाकीने दोघेही घरातून बाहेर पडले दोघेही विरुद्ध दिशेने येत असता जोरदार धडक झाली आणि त्यात इरफान शेख गंभीर जखमी झाले त्यांना रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी मुलाचा वडिलांना अटक केली असून मुलाला बाल सुधार गृहात पाठवले आहे. हा अल्पवयीन मुलगा इयत्ता दहावीचा असून त्याच्या रक्ताचे नमुने चाचणीला पाठवले आहे. 

Edited by - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Brother's Day 2024 Wishes भाऊ दिनाच्या शुभेच्छा