Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नांदेड मध्ये गाडीचा हॉर्न वाजवल्याने तरुणाने गाडीच्या छतावर चढून मारहाण केली, गुन्हा दाखल

arrest
, शनिवार, 28 डिसेंबर 2024 (16:14 IST)
महाराष्ट्रातील नांदेड मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रस्त्यात एका डॉक्टरने आपल्या वाहनाचा हॉर्न वाजवल्याने एका तरुणाला एवढा राग आला की त्याने डॉक्टरच्या वाहनावर चढून त्यांना मारहाण केली. या हल्ल्यात डॉक्टरने थेट पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सदर घटना शुक्रवारी नांदेड मध्ये आयटी चौकातली सकाळी 11:30 वाजेची आहे.दररोज प्रमाणे डॉक्टर आपल्या एसयूव्हीने नांदेडहून हॉस्पिटलला जाताना त्यांनी हॉर्न दिला. अचानक आयटीआय चौकात एका तरुणाला संताप आला आणि त्याने चक्क त्यांच्या गाडीच्या छतावर चढून त्यांना मारहाण करू लागला. अचानक झालेला हल्ला पाहून डॉ ने आपली गाडी थेट पोलीस ठाण्यात वळवली.आणि तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केले. रस्त्यावरून जात असताना अनेकांनी या घटनेचा व्हिडीओ बनवला. पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले असून या घटनेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी आरोपीच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे. 
Edited By - Priya Dixit
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत चालकाला मिरगीचा त्रास झाला,अनियंत्रित टेम्पोच्या धडकेत एकाचा मृत्यू तीन जखमी