पंढरपुरात बडवे समाजाने स्वतंत्र विठ्ठल मंदिर उभारले आहे. त्यामुळे आता पंढरपूर येथे दोन विठ्ठल मंदिर झाली आहेत. श्री विठ्ठल मंदिरात भाविकांना अपमानास्पद व वाईट वागणूक दिली जात असल्याने हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. उच्च न्यायालयाने बडवे-उत्पात यांना मंदिरातून सेवामुक्त केले होते.बडवे उत्पात व सेवधारी यांचे अधिकार व हक्क संपुष्ठात आले. दि.15 जानेवारी 2014 रोजी मंदिराचा ताबा शासनाकडे आला. त्यामुळे बडवे समाज नाराज होता. आपली नाराजी त्यांनी अनेकवेळा पूजा अर्चा व नित्योपचाराच्या निमित्ताने व्यक्त केली आहे. गेली 25 वर्षाचा लढा अयशस्वी ठरला. त्यामुळे बडवे समाजाचे बाबसाहेब बडवे यांनी त्यांच्या आईच्या स्मरणार्थ हे विठ्ठल मंदिर उभारले आहे. या मंदीरात विठ्ठल मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.