Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस

पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस
, सोमवार, 14 जून 2021 (08:09 IST)
सकाळी नऊ नंतर टोकन वाटप सुरु, गर्दी न करण्याचे आवाहन
 
पिंपरी चिंचवड शहरात सोम
वारी लसीकरण सुरु आहे. शहरात सोमवारी 12 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’ तर 54 केंद्रांवर मिळणार ‘कोविशील्ड’ लस मिळणार आहे. प्रत्येक केंद्रावर 100 लाभार्थ्यांचे लसीकरण होणार आहे. यासाठी केंद्रांवर सकाळी 9 वाजता टोकन वाटप सुरु होईल. दरम्यान नागरिकांनी लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये असे आवाहन महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे. सोमवारी लसीकरण सकाळी दहा ते सायंकाळी पाच या कालावधीत होणार आहे.
 
कोव्हॅक्सिन लसीचा 45 वर्षांपुढील लाभार्थ्यांना फक्त दुसरा डोस (पहिला डोस घेऊन 28 दिवस झालेले लाभार्थी) खालील आठ केंद्रांवर मिळेल –
# कै. ह भ प प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल, आकुर्डी
# यमुनानगर रुग्णालय – 1
# प्रेमलोक पार्क दवाखाना
# खिंवसरा पाटील हॉस्पिटल, थेरगाव
# आचार्य अत्रे सभागृह, वायसीएम रुग्णालयाजवळ, पिंपरी
# नविन जिजामता रुग्णालय
# कासारवाडी दवाखाना
# नवीन भोसरी रुग्णालय
 
सोमवारी कोव्हॅक्सिन लसीचा 18 ते 44 वयोगटातील लाभार्थींना फक्त दुसरा डोस (पहिल्या डोस नंतर 28 कालावधी झालेले लाभार्थी) खालील चार केंद्रांवर मिळेल –
# यमुनानगर रुग्णालय
# अहिल्याबाई होळकर सांगवी मनपा शाळा
# सावित्रीबाई फुले प्रायमरी स्कुल, भोसरी
# क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय (जुने तालेरा रुग्णालय), चिंचवड
 
सोमवारी 45 वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील लाभार्थी, एचसीडब्ल्यू, एफएलडब्ल्यू गटातील लाभार्थ्यांना कोविशील्ड लसीचा पहिला व दुसरा डोस (दुसरा डोस हा पहिल्या डोसनंतर 12 ते 16 आठवड्याच्या दरम्यान म्हणजे 84 ते 112 दिवसाच्या कालावधीत) शहरातील 54 लसीकरण केंद्रांवर देण्यात येणार आहे. सर्व केंद्रांवर 100 लाभार्थींच्या क्षमतेने सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत लसीकरण केले जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी सूचना पाठवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन