सध्या महापालिकेच्या शाळांमध्ये मुलांना सकस आणि पौष्ठिक आहार मिळण्यासाठी समितीची नेमणूक केली असून त्यासाठी 25 जिल्ह्यात प्रशिक्षण देण्यात आले आहे..नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आता शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात आठवड्यातून एकदा तरी अंडी किंवा केळी देण्यात येणार आहे.
महापालिकेच्या मुंबई, आणिकगाव, चेंबूर शाळेत काही विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली.या वरून अबू आझमी यांनी मुद्दा उपस्थित केला.अनेक शाळांमध्ये सुविधा अपुऱ्या आहे. मुलांच्या सकस आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. मुलांपर्यंत सहा महिने वस्तू पोहोचत नाही. शाळेत विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था देखील नाही. शाळेचे ऑडिट करावे तसेच श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी करण्यात आली.
मध्यान्ह भोजनात मुलांना खिचडी दिली जाती जी कमी प्रमाणात असते. काहींना तर खिचडी मिळत नाही. या साठी जे दोषी आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली. मुंबई महापालिकेच्या शाळेत 16 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. या प्रकरणात आहार पुरवठा करणाऱ्या संस्थेचे कामकाज काढून टाकले असून संस्थेवर गुन्हा दाखल झाला आहे. अशी घटना पुन्हा घडू नये या साठी धान्याची तपासणी केली जाईल .अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली. तसेच विषबाधाच्या फॉरेन्सिक तपासणीचा अहवाल उशिरा येत असल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.