Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसे कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ

eaknath khadse
, बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (21:41 IST)
एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंसह इतर 11 जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेत ही तक्रार दाखल करण्यात आली असून, खडसे कुटुंबियांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
 
काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांनी भाजपाकडे पाठ फिरवत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होण्यास प्राधान्य दिले. भाजपासोडून जाताना एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. मात्र, आता गिरीश महाजन गटाचे प्रशासक अरविंद देशमुख यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. मात्र, यासर्व प्रकरणामुळे मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. देशमुख यांनी मंदाकिनी खडसेंसह इतर ११ जणांविरुद्ध प्रशासक मंडळाने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली आहे. बरखास्त संचालक मंडळाने दूध संघात अनधिकृतपणे बैठक घेतल्याने प्रशासक मंडळाने आक्षेप घेत पोलिस ठाणे गाठले. विशेष म्हणजे तक्रार दाखल करणारे अरविंद देशमुख हे गिरीश महाजन गटाचे समर्थक आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना पक्षपमुख उद्धव ठाकरे यांनी केले 'हे' आवाहन