Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उप मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ : कोट्यांची संपत्ती जप्तीची आयकर विभागाकडून नोटीस

उप मुख्यमंत्र्यांच्या अडचणीत वाढ : कोट्यांची संपत्ती जप्तीची आयकर विभागाकडून नोटीस
, मंगळवार, 2 नोव्हेंबर 2021 (11:39 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. आयकर विभागाने यांच्याशी संबंधित असलेल्या कोटीची संपत्ती जप्त करण्याची नोटीस काढण्यात आली आहे.आयकर विभागाने काढलेल्या या नोटीस मध्ये एक साखर कारखाना, दक्षिण दिल्लीतील फ्लॅट, गोव्यात असलेली संपत्ती, मुंबईतील इमारतीचा समावेश आहे. 
 
गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आणि कार्यालयावर झडती घेण्यात आली. या मुळे अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे त्यात आता आयकर विभागाकडून अजित पवार यांच्या कोटीची संपत्ती जप्त करण्याच्या नोटीस मुळे त्यांच्या अडचणीत भर पडली आहे.  
 
गेल्या काही महिन्यापासून आयकर विभागाने राज्यातील विविध ठिकाण्यावर धाड टाकलेली असून त्यात 184 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता , संशयास्पद व्यवहार, कागदपत्रे सापडली आहे. ईडी कडून देखील  उपमुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांची चौकशी करण्याचे सत्र सुरु होते.  तसेच आयकर विभागाने कोल्हापूर, पुणे, मुंबई, गोवा ,दिल्ली आणि जयपूर येथील ठिकाणांवर छापेमारी केली आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दिवाळीत फटाके फोडण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी, असे केल्यास 20 हजारांचा दंड