Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

इन्क्‍युबेटरचा स्फोट, बालक 80 टक्के भाजले

pune
पुणे येथील हॉस्पिटलमधील इन्क्‍युबेटरचा स्फोट झाला आहे. हा इतका भयानक होता की यामध्ये त्यात ठेवलेले बालक 80 टक्के भाजला आहे. ही घटना तांबडी जोगेश्‍वरी मंदिराजवळील वात्सल्य हॉस्पिटलमध्ये  घडली आहे. यामध्ये  विश्रामबाग पोलीस ठाण्यात डॉक्‍टर व हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. 
 
बाळाचे वडील विजेंद्र विलास कदम ( वय 35,रा.मामलेदार कचेरीसमोर, शुक्रवार पेठ) यांनी फिर्याद दिली असून त्यामध्ये  डॉ. गौरव चोपडा आणी त्यांच्या कर्मचाऱ्यांविरुध्द हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
यामध्ये नवजात बाळाला जवळून पहाण्यासाठी  विजेंद्र त्यांचे  नातेवाईक आले हॉस्पिटल येथे आले होते. त्यांनी  बाळाला पाहून बाहेर आले. मात्र त्याच वेळी काही  मिनीटांतच स्फोट झाला होता. यामुळे सर्व जण बाळ ठेवलेल्या खोलीत पळाले. तेथे बाळ ठेवलेले इन्क्‍युबेटर जळून ते गंभीर जखमी झाले होते. पोलिस अधिक तपास करत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ट्वीट करता? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे...