इंदिरा गांधी महिला सहकारी सूत गिरणीच्या संस्थापक अध्यक्षा इंदुमती कल्लाप्पाण्णा आवाडे (वय – ८७) यांचे आज (शनिवार) दुपारी १२.१५ वाजता इचलकरंजी येथे त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. माजी खासदार माजी उद्योग राज्यमंत्री कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या त्या पत्नी होत्या. तर राज्याचे माजी वस्त्रोद्योग मंत्री विद्यमान आमदार प्रकाश आवाडे यांच्या त्या आई होत्या.
इंदुमती आवाडे या धार्मिक स्वभावाच्या होत्या. सामाजिक कार्याचीही त्यांना आवड होती. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांचे अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.