Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उद्योगमंत्री उदय सामंत आणि संभाजीराजे छत्रपतींच्या स्पीड बोटला अपघात

accident
, मंगळवार, 4 एप्रिल 2023 (21:41 IST)
राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगडचे पालकमंत्री उदय सामंत आणि स्वराज्य संघटनेचे प्रमुख संभाजीराजे छत्रपती यांच्या स्पीड बोटीला रायगड जिल्ह्यातील मांडवा येथे अपघात झाला. चालकाचे बोटीवरील नियंत्रण सुटल्याने स्पीड बोट जेटीच्या खांबाना जाऊन धडकली. सुदैवाने बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली टळली.
 
अलिबाग (जिल्हा रायगड) येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये किल्ले रायगड वर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळा नियोजना संदर्भातील बैठकीसाठी उदय सामंत गेट वे ऑफ इंडियावरून मांडवा (ता. अलिबाग जि.रायगड) येथे स्पीड बोटीने निघाले होते. यावेळी छत्रपती संभाजीराजे त्यांच्या सोबत होते. मांडवा जेट्टीजवळ पोहोचल्यावर चालकाने जेटीवर लावण्यासाठी बोट वळवली. मात्र यावेळी चालकाचे स्पीड बोटीवरील नियंत्रण सुटले आणि बोट जेटीच्या खालील खांबाना जाऊन धडकली. यावेळी बोटीचा वेग कमी असल्याने यावेळी मोठी दुर्घटना घडली नाही. नंतर मात्र बोट चालकाने बोटीवर नियंत्रण मिळवून बोट तरंगत्या तराफ्यावर सुखरूप लावली. तेव्हा सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. यानंतर पालकमंत्री सामंत हे मांडवा येथे सुखरूप उतरून मोटारीने अलिबागकडे रवाना झाले.
 
सुरुवातीला काय घडत आहे याचा अंदाज आम्हाला आला नाही. बोट जाऊन खांबाना आपटली तेव्हा लक्षात आले हे काही तरी भयंकर घडते आहे. सुदैवाने मोठी दुर्घटना झाली नाही. काही दिवसांपूर्वी याच मार्गावर प्रवास करताना स्पीड बोट वाटेतच बंद पडली होती. यापुढे स्थानिक आमदारांनासोबत घेऊनच स्पीड बोटीने प्रवास करण्याचे मी ठरवले आहे, असे उद्योगमंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा; ‘या’ भागात पावसाची शक्यता