Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'या' प्रकरणाची चौकशी करा, दरेकर यांची मागणी

'या' प्रकरणाची  चौकशी करा, दरेकर यांची मागणी
, शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (22:38 IST)
विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोग्य विभागातील परीक्षेतील घोटाळ्याची सीबीआय, निवृत्त न्यायधीशांच्यामार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी दरेकरांनी केली आहे. कंपनीने असमर्थता दाखवल्यामुळे आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द करण्याशिवाय पर्याय नव्हता असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभागाच्या गट क व गट ड पदाची परीक्षा शनिवार २५ आणि रविवार २६ सप्टेंबरला घेण्यात येणार होती. परंतु ऐनवेळी ही परीक्षाच रद्द करावी लागली.   आता  या कंपन्यांच्या घोटाळ्यातील चौकशी करावी अशी मागणी केली आहे.राज्य सरकारने जर चौकशी केली नाही तर सरकारविरोधात तीव्र आंदोलन करु असा इशारा प्रवीण दरेकर यांनी दिला आहे.
 
दरेकर यांनी म्हटलं आहे की, राज्य सरकराने न्यास कंपनीला डोळ्यापुढे ठेवून ८ ते १० वेळा शुद्धीपत्र काढले आहे. यामुळे आमची मागणी आहे की, जे शुद्धीपत्र काढण्यात आले ते या न्यास कंपनीला डोळ्यासमोर ठेवून केली हा आरोप असून याची चौकशी करण्यात यावी. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे वचन सभागृहात दिले होते की, एमपीएससीच्या माध्यमातून आरोग्य विभागाच्या परिक्षा घेण्यात येईल त्या आता घेण्यात यावी. विद्यार्थ्यांना जो प्रवासाचा मनस्ताप आला आहे. विद्यार्थ्यांचा खर्च झाला आहे. सर्वसामान्य कुटुंबातील ही मुलं आहेत त्यांची शासनाने खर्चाची जबाबदारी घ्यावी.
 
परिक्षांचा विषय जरी आरोग्य विभागशी संबंधित असला तरी आरोग्य विभाग, त्या खात्याचे मंत्री, अधिकारी यांनी एकत्रितपणे हा महाघोटाळा केला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीसुद्धा परिक्षांमध्ये घोटाळा झाला असल्याचा आरोप केला आहे. या सगळ्या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी असल्याचे प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाईंदर खाडीवरील जुना वर्सोवा पूल दुरुस्तीचे काम पुढे ढकलले