Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश--मुख्यमंत्री

shinde
, सोमवार, 29 ऑगस्ट 2022 (07:58 IST)
मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर स्वतंत्र मार्गिका करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले.
 साताऱ्याहून मुंबईकडे परतताना दुपारी पुण्यातील चांदणी चौक परिसराला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली (खालापूर) टोलनाक्याला भेट दिली. महामार्गावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची मुख्यमंत्री शिंदे यांनी गांभीर्याने दखल घेतली. सण-उत्सव, सुट्टय़ांच्या काळात या द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी आणि पथकर नाक्यावर होणारी गर्दी टाळण्यासाठी मनुष्यबळ वाढवावे, सीसीटीव्ही यंत्रणा सक्षम करण्याबरोबरच अपघात टाळण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
गणेशोत्सव, शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टोल नाक्यांवर ट्रॅफिक वॉर्डन, टोल वसूल करण्यासाठी स्कॅनिंग मशिन्सची संख्या वाढवावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी महामार्ग पोलीस आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IND vs PAK हार्दिक पांड्याने षटकार ठोकून विजय मिळवला, भारताने पाकिस्तानवर 5 विकेट्सने मात केली