Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मराठा आंदोलन आक्रमक संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट व एसटी सेवा बंद

मराठा आंदोलन आक्रमक संभाजीनगर, जालना, बीड जिल्ह्यातील इंटरनेट व एसटी सेवा बंद
, सोमवार, 26 फेब्रुवारी 2024 (16:26 IST)
राज्यभरातही मराठा आंदोलन आक्रमक होत असून काल मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जीवे मारण्याचा प्रयत्नात आहे असं खळबळजनक आरोप लावला असून जरांगे हे मुंबईच्या दिशेने निघाले असता जालन्यातील अंबड तालुक्यात संचारबंदी लागू केल्याने ते परत आले. सध्या ते भांबेरी गावात असून त्या ठिकाणी मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणात एकत्रित होत आहे. 
 
सध्या राज्यभरातील मराठा रक्षण आंदोलन करणारे आंदोलक आक्रमक होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या जालना, बीड, आणि छत्रपती संभाजी नगर या तीन जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. गृह विभागाकडून इंटरनेट सेवा 10 तास बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आज जालना- घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी गावात अज्ञातांनी बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. तीर्थपुरी गावात सकाळी साडेसहाच्या सुमारास अंबड येथून रामसगाव कडे जाणाऱ्या अंबड आगाराच्या बसला अडवून अज्ञातांनी पेटवून दिले. अंबड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनोज जरांगेंकडून आमरण उपोषण मागे, डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेणार