Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पुणे : सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

पुणे : सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद
, शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018 (09:19 IST)
मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या राज्य व्यापी बंदमध्ये अनेक ठिकाणी बसची  तोडफोड  करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे. शिरुर, खेड, बारामती, जुन्नर, मावळ, दौंड, भोर या तालुक्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.पुण्यातबंदच्या निमित्तानं सात हजार पोलीस तैनात करण्य़ात आले आहेत. पुण्यातल्या सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तर तिकडे औरंगाबादमध्येही जनजीवन पूर्णपणे ठप्प आहे. आगारातून एकही एसटी सुटलेली नाही. शाळा, महाविद्यालयं आधीच बंद ठेवण्यात आले आहेत.
 
मराठा आरक्षणासाठी आज पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून काही शहरांनी माघार घेतली आहे. मुंबई, नवी मुंबईतील मराठा समन्वय समितीने बंदमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही शहरात केवळ काळ्या फिती लावून आंदोलन केलं जाणार आहे. मुंबईत वांद्रे येथील उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं जाणार आहे. मात्र एसटी महामंडळाने मुंबईतले तीनही एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

इंडो- म्यानमार‘मैत्री पूल’खुला