महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जागतिक आर्थिक परिषद म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडच्या दावोस इथे गेले आहेत.फक्त शिंदेच नाही तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस बोम्माई यांच्यासह देशातले मोठे उद्योगपती देखील या परिषदेत सहभागी झाले.
त्यामध्ये मुकेश अंबानी, गौतम अडानी, टाटा ग्रुपचे एन चंद्रशेखरन, आदर पूनावाला, कुमार मंगलम बिर्ला, सज्जन जिंदाल, नदीर गोदरेज यांचाही समावेश आहे. दाओसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'च्या वतीनं आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पहिल्याच दिवशी महाराष्ट्राला 45 हजार 900 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डाव्होस येथील 'महाराष्ट्र पॅव्हेलियनला भेट दिली.या महाराष्ट्र पॅव्हेलियन मध्ये राज्याच्या प्रगतीचे प्रभावी दर्शन होणार असून महत्त्वाच्या उद्योगासमवेत सामंजस्य करार केले जातील अशी माहिती महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध कंपन्यांशी सामंजस्य करार केले असून आता राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळणार. परिषदेच्या पहिल्याच दिवशी स्वित्झरलॅन्डच्या डाव्होस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या विद्यमाने आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्र राज्यात सुमारे 45900 कोटींची गुंतवणूक करण्यात आली.