Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तिकीट चेकरसाठी 15 लाख लागतील’! नोकरीचे आमिष देणाऱ्यास ठोकल्या बेड्या

arrest
, शुक्रवार, 8 एप्रिल 2022 (21:29 IST)
नाशिक रेल्वे विभागामध्ये नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत फसवणूक करणाऱ्या तीन आरोपींविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून एका संशयितास अटक केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली.
 
याबाबत नांदगाव पोलीस ठाण्यात नांदगाव मध्ये राहणारे चेतन शिवाजी दिघे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रेल्वेमध्ये तिकीट तपासणीस म्हणून तसेच जेटमनपदावर नोकरी लावून देण्याच्या आमिषाने व बनावट नियुक्तीपत्र सही शिक्के दोन ऑनलाइन फॉर्म भरून यातील संशयित ज्ञानेश नथू सूर्यवंशी (गणपती मंदिर पवन नगर सोयगाव मालेगाव) या पदासाठी15 लाख आणि जेटमन पदासाठी बारा लाख रुपये लागतील असे सांगून फिर्यादी व त्यांच्या मित्र परिवार कडून पैसे घेतले.
 
तसेच सह संशयित सतीश गुंडू बच्चे (सद्गुरू हाइट्स, पुणे) तसेच संतोष शंकर पाटील (वंडर सिटी कात्रज पुणे) यांनी बनावट सही शिक्के तसेच सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल भायखळा, बॉम्बे हॉस्पिटल मुंबई, राणी मुखर्जी हॉस्पिटल, उत्तर रेल्वे दिल्ली या ठिकाणी मेडिकल झाल्याचे बनावट प्रमाणपत्र देऊन फसवणूक केली होती.
 
या प्रकरणात ज्ञानेश्वर सूर्यवंशी याला पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नांदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामेश्वर गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर पाटील, पोलीस कर्मचारी भारत कांदळकर, अनिल शेरकर इत्यादीचे पथक तपास करत आहे. तर या टोळीकडून ज्या नागरिकांची फसवणूक झाली. त्यांनी नाशिक ग्रामीण पोलिसांशी संपर्क करावा असे आवाहन देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

दंगल! पैलवान बाळू बोडकेची साताऱ्यात ‘सुवर्ण’कामगिरी