जालना- सुमारे शंभर वर्षापासून बहुप्रतिक्षित जालना- खामगाव रेल्वेमार्ग यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात मंजूर होणार आहे. नव्हे तशा आशयाची शिफारस करण्याचे आश्वासनच मुख्यमंत्र्यांनी खा. रावसाहेब दानवे आणि रेल्वे संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाला दिले अस्याची माहिती समितीचे सचिव फेरोज अली यांनी दिली आहे.
यासंदर्भात रेल्वे संघर्ष समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की मुंबईमध्ये सह्याद्री अतिथी गृहावर आगामी वर्षाच्या अर्थसंकल्पाच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खासदारांची तातडीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला जालना रेल्वे संघर्ष समितीसह संपूर्ण मराठवाड्यातील शिष्टमंडळे होती. शिवाय 18 खासदार उपस्थित होते.