Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जळगाव जिल्हा अनलॉक, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश ; वाचा काय आहेत नवे नियम

जळगाव जिल्हा अनलॉक, जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश ; वाचा काय आहेत नवे नियम
, मंगळवार, 3 ऑगस्ट 2021 (15:52 IST)
राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या कमी होत आहे त्या जिल्ह्यातील निर्बंध शितल करण्याचे आदेश राज्य शासनाने काढले होते. राज्य शासनाच्या आदेशाला अनुसरून जळगाव जिल्ह्यासाठी जे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी पारित केले असून सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सकाळपासून रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. तर शनिवारी दुकानांना तीन वाजेपर्यंतच उभा असून रविवारी सर्व बंद ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश उद्या दिनांक ०४ पासून लागू होतील.
 
वाचा काय सुरु काय बंद राहणार?
 
-सर्व प्रकारचे जीवनावश्यक वस्तू तसेच जीवनावश्यक वस्तू विक्री न करणारी दुकाने तसेच मॉल्स सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी ३ पर्यंत सुरु राहतील. रविवारी जीवनावश्यक वगळता इतर सर्व दुकाने आणि मॉल्स बंद राहतील.
 
-सर्व सार्वजनिक उद्याने, मैदाने व्यायाम,चालणे,धावणे ,सायकलिंग आदींसाठी खुले करण्यात आले आहेत.
 
-लग्न समारंभसाठी एका वेळेस केवळ ५० लोकांची उपस्थिती राहिलं, रात्री ८ वाजेपावेतो.
 
-जिम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटी पार्लर्स, केश कर्तनालय यांनी वातानुकूलन वापरायचे नसून, सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवता येतील. शनिवारी दुपारी ३ पर्यंत आणि रविवारी पूर्ण बंद राहतील.
 
– सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने  सुरु ठेवणार.
 
– सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकाम, वस्तूंची वाहतूक, उद्योग हे पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
 
– चित्रपटगृहे, नाट्यगृहे, तसेच मॉल्समधील मल्टीप्लेक्स हे बंद राहतील. यात कोणतीही सूट नाही.
 
– सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंदच राहतील.
 
– सर्व शाळा, शैक्षणिक संस्था, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस, प्रशिक्षण सुरु राहणार.
 
– सर्व उपाहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेसह सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरु राहतील. मात्र आरोग्याच्या कोविडविषयक नियमांचे पालन करावे लागेल. टेक अवे किंवा पार्सल सेवा सध्याप्रमाणे सुरु ठेवता येईल.
 
– रात्री ९ ते सकाळी ५ या वेळेत अत्यावश्यक कारणांशिवाय बाहेर पडता येणार नाही.
 
– गर्दीमुळे संसर्ग वाढू नये म्हणून वाढदिवस समारंभ,राजकीय सामाजिक,सांस्कृतिक समारंभ,निवडणुका,प्रचार, मिरवणुका,निदर्शन मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत
 
– मास्क वापरणे, सुरक्षित अंतर यासारखे कोरोना प्रतिबंधक नियम सर्व नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५, साथरोग कायदा,आणि भारतीय दंड संहितेमधील तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मित्रांच्या पैसे परत द्या या तकाद्यामुळे तरुणाची आत्महत्या, तीन महिन्यांनी गुन्हा दाखल