Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Jalna : जालन्यात दोन गटात तुफान हाणामारी

Clash between two groups
, शुक्रवार, 25 ऑगस्ट 2023 (10:10 IST)
राज्यातील जाळण्यात किरकोळ वादावरून दोन गटात तुफान हाणामारीची घटना घडली आहे. गुरुवारी रात्री जालनातील गांधी चमन चौकात हाणामारीची घटना घडली आहे. दोन गट एकमेकांच्या समोर आले आणि एकमेकांना किरकोळ वादावरून लाथाबुक्यांनी मारहाण केली. लोखण्डी रॉड ने मारहाण केली , वाहनांचे काच फोडले, या मारहाणीत काही तरुण जखमी झाले आहे. 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यावर ते घटनास्थळी पोहोचले. पोलिसाना आलेले पाहून या तरुणांनी पळ काढला. 

या हाणामारीत काही तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या  प्रकरणाचा तपास करत आहे. 
 

Edited by - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Donald Trump :डोनाल्ड ट्रंप यांचं आत्मसमर्पण,दोन दशलक्ष डॉलर्सच्या जातमुचलक्यावर सुटका