Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

जवखेडे खटल्याचा निकाल पुन्हा लांबणीवर, आता मिळाली ही तारीख

murder
, गुरूवार, 26 मे 2022 (21:11 IST)
नगर जिल्ह्यातील प्रदीर्घकाळ रखडलेल्या जवखेडे येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणाता निकालही विविध कारणांमुळे लांबणीवर पडत आहे. आज तिसऱ्यांदा हा निकाल लांबणीवर टाकण्यात आला.
 
आता 31 मे रोजी निकाल देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले.या खटल्याची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर निकालाची तारीख जाहीर करण्यात आली. त्यानंतर दोनदा पुढील तारीख देण्यात आली. आज २६ तारखेला निकाल दिला जाणार होता.
 
त्यासाठी बंदोबस्ताची तयारीही झाली. मात्र, प्रत्यक्षात 31 मे ही तारीख देण्यात आली.21 ऑक्टोबर 2014रोजी जवखेडे खालसा, ता. पाथर्डी येथे संजय जगन्नाथ जाधव, जयश्री संजय जाधव व सुनील संजय जाधव या एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती.
 
जाधव कुटुंबीयांच्या भावकीतीलच प्रशांत दिलीप जाधव, अशोक दिलीप जाधव आणि दिलीप जगन्नाथ जाधव यांना यामध्ये अटक करण्यात आली आहे. बराच काळ रखडल्यानंतर आलीकडेच कामकाज पूर्ण झाले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

11 तासांच्या झाडा-झडतीनंतर ईडीचं पथक परबांच्या घराबाहेर