Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पवार लोकशाहीवर प्रचंड विश्वास - जितेंद्र आव्हाड

jitendra aahwad
, शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (15:14 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पावर  यांच्या संसदीय कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विधान सभेत मांडण्यात आलेल्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना आ. जितेंद्र आव्हाड  यांनी पवार साहेबांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास असून ज्यांना सत्तेच्या दरवाज्यापासून कोसो दूर रहावं लागत होतं त्यांना सत्तेच्या केंद्रापर्यंत नेण्याचं काम शाहूंनंतर पवार साहेबांनी केलं, असे म्हटले. इथल्या महिलांवर अन्याय होऊ नये त्यांना समानता मिळावी म्हणून महिलांना आरक्षण देण्याचा निर्णय पवार साहेबांनी घेतला. पवार साहेबांनी केलेल्या कामांमुळे आज आपला देश ४२ देशांना पोसत आहे. बेळगावचा प्रश्न कधीच सुटला असता अशी आखणी पवार साहेबांनी केली होती, पण दुर्दैवाने ९५ साली सत्ता गेली आणि तो प्रश्न प्रलंबित राहिला. पवार साहेबांना प्रत्येक गोष्टीत रस आहे त्यामुळे क्रिकेट, साहित्य, कला या सर्व क्षेत्रांसाठी त्यांनी काम केलं, असंही ते म्हणाले..

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाईक अ‍ॅम्ब्यूलन्स सुविधा ठरली फायदेशीर