महाविकास आघाडीकडून १७ डिसेंबर रोजी मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे.या महामोर्चासाठी अद्यापही पोलीस परवानगी मिळालेली नाही. राज्यभरातून कार्यकर्त्यांना मुंबईत आणण्यासाठी एसटी आरक्षित करण्यास गेले असता त्यांना पोलीस परवानगी घेऊन या असं सांगण्यात आलं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं आहे.
काल महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडाळाच्या कार्यालयात आम्ही एसटी बस मागायला गेलो होतो. तिथे महाव्यवस्थापकांनी आम्हाला एसटी देऊ पण आधी पोलीस परवानगी घेऊन या असं सांगितलं. आम्ही हजारो वेळेस एसटी वापरली. पण कधीही असं झालं नव्हतं. याचा अर्थ वेगळा निघतोय. सरकारची नियत मोर्चाबाबत साफ आहे, असं वाटत नाही. पण मोर्चा निघणारच! असं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनीही पत्रकार परिषद घेऊन परवानग्या मिळाल्या नसल्या तरीही मोर्चा निघणारच असल्याचे जाहीर स्पष्ट केले. तसंच, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही केले.
Edited by : Ratnadeep Ranshoor