Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जितेंद्र आव्हाड म्हणतात, आता, याच महिलेकडून बलात्काराचा आरोप

jitendra awhad
, बुधवार, 4 जानेवारी 2023 (21:21 IST)
राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा मतदारसंघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर भाजपाच्या एका महिला पदाधिकाऱ्याने त्यांच्यावर विनयभंगाची तक्रार केली होती. मात्र, आता, याच महिलेकडून बलात्काराचा आरोप करण्यासाठी तयारी सुरू आहे, असा धक्कादायक दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी ट्विट करून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
 
जितेंद्र आव्हाड यांनी काही वेळापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला गाडीत बसली आहे. ही गाडी मंत्रालयाबाहेर उभी असल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच, ही महिला मंत्रालयात जाऊन कोणाला भेटली, कशी भेटली अशी मंत्रालयात चर्चा सुरू असल्याचंही जितेंद्र आव्हाडांनी म्हटलं आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये म्हणतात की, 354 चा कट फसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून 376 ची तयारी सुरु केली आहे. 354 मध्ये नाट्यपूर्ण भूमिका घेणा-या आता या कटातही आघाडीवर आहेत. आज दुपारी त्या मंत्रालयासमोर गाडीत बसलेला व्हिडीओ मत्या कोणाला भेटल्या, कशा भेटल्या चर्चा मंत्रालयात सुरु आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

देवेन भारती यांची गृह विभागाकडून मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती