अकरावी ऑनलाइन प्रवेश अर्जांना सुरुवात
शिक्षण संचालनालयाने 2023-24 या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या साईटवर 20 मे पासून अर्ज भरण्यासाठीचा सराव करता येणार आहे. 25 मे पासून प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागासाठी नोंदणी करता येईल. प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले असून वर्गही लवकर सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबई महानगर प्रदेश, पुणे-पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर आणि अमरावती महानगरपालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांसाठी केंद्रीकृत ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर प्रवेशाची पहिली फेरी होणार असून ऑगस्टअखेर संपूर्ण प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.
राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल लवकरच लागणार असून ही पुढील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि संस्थांतर्गत राखीव जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु होईल, अशी शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.
11 वी प्रवेश प्रक्रियेला 25 मे पासून सुरुवात होणार असून अर्ज भरण्यासाठी https://11thadmission.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.