महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात वेगळेच चित्र पहायला मिळत आहे कारण कॉंग्रेस नेते सुरेश कलमाडी यांच्या समर्थनार्थ पोस्टर्स पुण्यात चौका-चौकात झळकताना दिसत आहेत. कलमाडी को लाओ, कॉंग्रेस बचाओ आणि तिकीट विकणार्यांना हटवा, कॉंग्रेस वाचवा अशी वाक्य या पोस्टरवर लिहिण्यात आली आहेत. मात्र ही पोस्टर कुणी लावली, हे अद्याप समजू शकलेले नाही. दरम्यान, या पोस्टरबाजीमुळे कॉंग्रेसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
मुंबई कॉंग्रेसमध्येही तिकीट वाटपावरुन मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याविरोधात अनेक नेते समोर आले होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत, नारायण राणे यांनी संजय निरुपमांविरोधातील नाराजी जाहिरपणे बोलून दाखवली होती. तर कॉंग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांची एकाधिकारशाही असल्याचे सांगत पक्षाला रामराम ठोकला होता.