महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्येही पूर आला आहे. यामध्ये आतापर्यंत बर्याच जणांचा मृत्यू झाला आहे. तसंच 5 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.
केरळच्या काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्यानं 3 दिवस रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे 12 जिल्ह्यांत जनजीजन विस्कळीत झालं आहे. या जिल्हांमध्ये गुरुवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काही ठिकाणी अनेक घरांमध्ये पाणी शिरले आहे. मलप्पूरम आणि कोझीकोडला जोडणार्या रस्त्यावर पाणी साचल्याने या मार्गावर वाहतूक ठप्प आहे. केरळमध्ये अतिवृष्टी आणि पूरामुळे 14 जणांचा मृत्यू झाल आहे.
वायनाडमध्ये पूराचा सर्वाधिक फटका बसला असून पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत असल्याचे विजयन यांनी सांगितले. रात्रीनंतर पावसाचा जोर वाढल्याने मदत कार्यात अडचरी येत आहेत. मलप्पूरम आणि इडुक्की भागात मुसळधार पाऊस पडत आहे.
पावसामुळे सर्व शाळा आणि कॉलेज बंद
जोरदार पावसामुळे केरळचे सर्व शैक्षणिक संस्थानांना सुटी देण्यात आली आहे. आधीपासून घोषित महाविद्यालय आणि बोर्ड परीक्षांसाठी सुट्टी लागू करण्यात आली नसून ह्या परीक्षा पूर्व निर्धारित कार्यक्रमानुसारच होणार आहे.