Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ

खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ
, सोमवार, 19 जुलै 2021 (23:57 IST)
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीत पुन्हा वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार 20 जुलैपर्यंत मुदतवाढ करण्यात आली आहे. एएनआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. याआधीही 15 आणि त्यानंतर19 जुलैपर्यंत वाढ करण्यात आली होती. ही मुदत संपत असल्याने पुन्हा मुदतवाढ करण्यात आलीये. गिरीश चौधरी यांना ईडीने 5 जुलैला अटक केली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुण्यातील  भोसरी जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गिरीश चौधरी यांना अटक केली होती. 
 
खडसे महसूल मंत्री असताना व्यवहार झाला. त्यामुळे खडसेंनी पदाचा दुरुपयोग करून त्यांच्या पत्नी आणि जावयाने ही जमीन विकत घेतल्याचा आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर खडसेंना पदावरुन पायउतार व्हावे लागले होते. खडसेंनी 4 जून 2016 रोजी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भुजबळ यांनी त्यांच्या सरकारविरोधात संघर्ष केला पाहिजे