Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 30 April 2025
webdunia

दुर्दैवी आजारी आईचा केला मुलाने केली हत्या

Killed by the child
, मंगळवार, 4 सप्टेंबर 2018 (09:25 IST)
यवतमाळ येथील गोधनी रोड परिसरातील असलेल्या गुरूनानक नगर येथील शांताबाई नारायण उइके (वय 55 ) वर्षीय महिलेचा मुलगा कैलास उईके याने लोखंडी रॉड डोक्यावर मारून निर्घुण हत्या केली आहे. हा झालेला प्रकार कळताच  उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी घटनास्थळाला भेट दिली. आरोपी मुलगा कैलास नारायण उईके (वय 35 ) याला अवधूत वाडी पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने छोटी गुजरीतील दारूच्या गुत्त्यावरुन एका तासात पकडले.
 
मृतक शांताबाई ऐसेही आजाराने त्रस्त असून खाटेवरती झोपून होती. दरम्यान  मुलगा कैलास घरी आला आई सोबत वाद झाल्याने त्याने लोखंडी रॉड डोक्यावर मारला. आरोपी कैलास नारायण उईके हा  रात्री केव्हा जेवण करण्यासाठी येत असल्याची माहिती मृतकाचे पती नारायण उईके यांनी सांगितले. आरोपी कैलास वर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालय आणि खाजगी रुग्णालय येथे उपचार सुरू होते. घटनेच्या वेळी मृतक शांताबाई यांचा लहान मुलगा मंगेशची पत्नी राणी उईके ही घरी असून तिने अवधूत वाडी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यावरून अवधूत वाडी पोलीस स्टेशनचे डीबी पथक प्रमुख मनोज लांडगे. पोलीस कॉन्स्टेबल मेंढवे, सलमान शेख, इमाम मुलानी व मुंडे यांनी आरोपी कैलास याला छोटी गुजरी परिसरात असलेल्या दारूच्या गुत्त्यावरन अटक केली. पुढील तपास अवधूत वाडी पोलीस ठाणे करीत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Realmeच्या स्मार्टफोनची ४ सप्टेंबरलापासून फ्लिपकार्टवर विक्री