Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Saturday, 5 April 2025
webdunia

संजय राऊतांच्या वक्तव्यावर किरीट सोमय्यांचा टोला, सैफ प्रकरणाला राजकीय स्टंट म्हटले

Kirit Somaiya hits out at Sanjay Raut's statement
, शुक्रवार, 24 जानेवारी 2025 (15:24 IST)
संजय राउत यांच्या तीसरा उपमुख्यमंत्री वक्तव्यावर शुक्रवारी किरीट सोमैया यांनी टोला लगावला आहे. शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत म्हणाले, “महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार आहे. ते त्यांच्यापैकी कोणीतरी असावे.या वर किरीट सोमय्या म्हणाले, संजय राउत आज बोलतात आणि उद्या विसरतात. त्यांना त्यांचेच म्हटलेले लक्षात ठेवता येत नाही. 
संजय राऊतांनी गेल्या अडीच वर्षात जे काही भाकित केले त्यांना ते दुसऱ्या दिवशीच विसरले.त्यांना मीडियामध्ये राहण्यासाठी स्टंट करायचे असतील तर त्यांना करु द्यावे.किरीट सोमय्या यांनी सैफ अली खान यांच्यावर झालेल्या हल्ल्यावर देखील आपले वक्तव्य दिल. त्यांनी या प्रकरणी आपली भूमिका स्पष्ट केली.सैफ वर अटक करणाऱ्या आरोपीच्या वडिलांच्या वक्तव्यावर सोमैय्या म्हणाले, जर आरोपीचे वडील बांग्लादेशात बसून इतके चिंतित आहे की आपला मुलगा कुठे आहे असे त्यांनी सांगावे. पोलिसांकडे सर्व पुरावे आहे.  

विरोधकांवर निशाना साधत ते म्हणाले, बांगलादेशात बसलेल्या आरोपीच्या वडिलांचे म्हणणे ऐकून विरोधी पक्ष राजकीय स्टंटबाजी करत आहे. ज्या व्यक्तीने सैफ अली खानवर हल्ला केला तो बांगलादेशचा आहे, त्याच्यावर भारतात खटला चालवला जाईल आणि त्याची शिक्षा पूर्ण केल्यानंतर त्याला बांगलादेशला पाठवले जाईल.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भंडारा अपघातावर देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केले,पटोले यांनी सरकारवर साधला निशाणा