Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किरीट सोमय्या म्हणजे तमाशातला ‘गांजाडीया’, किशोरी पेडणेकरांची टीका

Kirit Somaiya
, बुधवार, 12 जानेवारी 2022 (08:13 IST)
भाजपचे नेते किरीट सोमय्या म्हणजे तमाशातला ‘गांजाडीया’ आहेत, अशा शब्दात मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी टीका केली आहे. तसेच, किरीट सोमय्या हे केवळ आरोप करण्यासाठी ठेवलेला माणूस आहेत. त्यांना जसे सांगितले जाते तसे ते बोलतात. मात्र त्यांनी केवळ भ्रष्टाचाराचे आरोप न करता त्याबाबत काही पुरावे असतील तर ते सादर करावेत, असे आव्हान महापौर किशोरी पेडणेकर यांनी किरीट सोमय्या यांना दिले आहे.
 
पेडणेकर म्हणाल्या, सोमय्या हे केवळ आरोप करत सुटले आहे. त्यांच्याकडे कुठलेही पुरावे नाहीत. ते फक्त बिनबुडाचे आरोप करतात आणि मिडीयावर धूमाकूळ घालतात. स्वत:ला समोर करण्यासाठी ते प्रत्येकाच्या अब्रु काढतात. मात्र, आमची आब्रु इतकीही तकलादु नाही की, अश्या ठेवलेल्या माणसांने कधीही उठाव आणि काहीही आरोप करावे. त्यांचे अनेक तमाशे हे लोकांनी बघीतले आहेत. तमाशामध्ये असलेला गांजाडीया सारखे त्यांचे काम आहे. त्यामुळे यांच्यावर लक्ष का द्यावे, असा प्रश्न पडतो, अश्या शब्दात पेडणेकरांनी घणाघात केला आहे.
 
सोमय्याकडे काही पुरावे असल्यास सादर करा. मात्र, एका तिराने सर्वांना मारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यांनी आतापर्यंत केलेला एकतरी आरोप त्यांनी सिद्ध केला का? असा सवाल पेडणेकरांनी सोमय्यांना केला. त्या म्हणाल्या की, ज्या-ज्या वेळी सोमय्या माझ्या पक्षावर बोलतील त्यावेळी मी उत्तर देणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. कुठलेही काम एका सिस्टमनुसार चालते. त्यामध्ये काही चुकीचे झाले असेल तर, ते सिद्ध करा त्यावर आम्ही कारवाई करू मात्र, याला बाजूल ठेवत माझ्यावर, अदित्य ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व यशवंत जाधव यांच्यावर टीका करत आहेत. यशवंत जाधव त्यांच्यावर झालेल्या आरोपोचे उत्तर द्यायला ते सक्षम आहेत. मिडीया दिसला की निव्वळ टीका करण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. अशी टीका पेडणेकरांनी केली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

धक्कादायक: नाशिकला तरुणीच्या अपहरणाचा प्रयत्न, काका-पुतणीचा प्रतिकार