Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अनिल चौहान: भारताचे नवे CDS यांच्याबद्दल या 12 गोष्टी माहिती आहेत का?

अनिल चौहान: भारताचे नवे CDS यांच्याबद्दल या 12 गोष्टी माहिती आहेत का?
, गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (14:07 IST)
लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अनिल चौहान भारताचे नवे CDS असतील. ते लष्करी विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील.
 
देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होतं. गेल्या वर्षी आठ डिसेंबरला देशाचे पहिले सीडीएस बिपीन रावत यांचा हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. त्यानंतर नऊ महिन्यानंतर चौहान यांची नियुक्ती झाली आहे.
 
चौहान यांच्याबद्दलच्या 12 महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.
1. अनिल चौहान यांनी अनेक कमांडचं नेतृत्व केलं आहे. ते 40 वर्षांपेक्षा अधिक काळ लष्करात होते. जम्मू काश्मीर आणि ईशान्य भारतात त्यांना दहशतवाद विरोधी कारवाईचा व्यापक अनुभव आहे.
 
2. अनिल चौहान यांचा जन्म 18 मे 1961 ला झाला होता. 1981 मध्ये ते भारतीय लष्कराच्या 11 गोरखा रायफल्समध्ये सहभागी झाले.
 
3. त्यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (NDA) खडकवासला आणि भारतीय लष्कर प्रबोधिनी (IMA) देहरादून या संस्थांमधून प्रशिक्षण घेतलं आहे.
 
4. मेजर जनरल या पदावर असताना त्यांनी जम्मू काश्मीरच्या बारामुला सेक्टरमध्ये नॉर्दन कमांडमध्ये इन्फ्नट्री विभागाची जबाबदारी सांभाळली.
 
5. लेफ्टनंट जनरल या पदावर असताना त्यांच्याकडे ईशान्य भारताची जबाबदारी होती. भारतीय लष्करात 14 विभाग होते.
 
6. सप्टेंबर 2019 ते मे 2021 पर्यंत म्हणजे निवृत्तीपर्यंत ते इस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ होते.
 
7. त्याव्यतिरिक्त त्यांनी मिलिट्री ऑपरेशन्स विभागाच्या महासंचालक या पदावरही काम केलं आहे.
 
8. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांनी संयुक्त राष्ट्रात 'अंगोल मिशन'मध्येही काम केलं आहे.
 
9. 31 मे 2021 मध्ये ते लष्करातून निवृत्त झाले.
 
10. लष्करातून निवृत्त झाल्यानंतरही ते राष्ट्रीय सुरक्षा आणि महत्त्वाच्या विषयावर योगदान देत राहिले.
 
11. लष्करात असताना त्यांना परम विशिष्ट सेवा मेडल, उत्तम युद्ध सेवा मेडल, अति विशिष्ट सेवा मेडल, सेन मेडल आणि विशिष्ट सेना मेडलने सन्मानित करण्यात आलं आहे.
 
12. देशाचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावतही उत्तराखंडचे होते. अनिल चौहानही उत्तराखंडचे आहेत.
 
सीडीएस पदाच्या मुख्य जबाबदाऱ्या
लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यात योग्य समन्वय साधणं, देशाच्या लष्कराला शक्तिशाली करणं ही त्यांची मुख्य जबाबदारी आहे,
 
केंद्र सरकारच्या मते सीडीएसची मुख्य जबाबदारी संरक्षण मंत्र्यांचा सल्लागार ही आहे. तिन्ही दलांच्या सैन्यदलाची प्रकरणं त्यांच्या अखत्यारित येतात.
 
डिफेन्स इक्विजिशन काऊंसिल (डीएसी) आणि डिफेन्स प्लानिंग कमिशन (डीपीसी) यासारख्या महत्त्वाच्या गटात त्यांना स्थान मिळेल.
 
जेव्हा जनरल बिपीन रावत यांची सीडीएस पदावर नियुक्त केलं तेव्हा ते लष्करप्रमुख होते आणि निवृत्तीच्या उंबरठ्यावर होते.
 
सीडीएस पदावर त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी झाली होती आणि या पदासाठीची वयोमर्यादा 65 वर्षं केली होती.
 
अनिल चौहान 61 वर्षांचे आहेत. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा झाला तर त्यांच्याकडे तीन वर्षं ही जबाबदारी असेल .
 
एकूण त्यांच्याकडे तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. पहिली सीडीएसची जबाबदारी, दुसरा चेअरमन, चीफ ऑफ स्टाफ कमिटी, तिसरी जबाबदारी DMA ची असेल. संरक्षण मंत्रालायच्या अंतर्गत हा विषय येतो.
 
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये बिपीन रावत यांचं हेलिकॉप्टर अपघातात निधन झालं होतं. जनरल बिपीन रावत MI-17 V5 हेलिकॉप्टरमध्ये होते. त्यांची पत्नीही त्यांच्या बरोबर होती. या दुर्घटनेत रावत दाम्पत्य आणि इतर 11 लोकांचा मृत्यू झाला होता.

Published By : Rupali Barve

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना कोणाची? उद्धव ठाकरेंकडे आता आहेत 'हे' 4 पर्याय