करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराचं इतिहासात पहिल्यांदाच स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलं. या ऑडिटच्या अहवालानुसार मंदिराच्या छतावर 5 ते 6 फुटाचा कोबा करण्यात आला आहे. मात्र मूळ मंदिराच्या बांधकामात तो दिसून येत नाही. याबाबत पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी माहिती दिली आहे.
ऑडिट रिपोर्टनुसार मंदिराच्या मूळ इमारतीवर 1 हजार टनाचा अतिरिक्त बोजा पडला आहे. तो लवकरात लवकर उतरुन घेण्याची गरज बोलून दाखवली आहे. 50 ते 60 वर्षांपूर्वी मंदिरातील गळती रोखण्यासाठी टप्प्याटप्प्याने हा कोबा केला असावा असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ऑडिटमधून ही गंभीर बाब समोर आल्यानंतर हा कोबा काढून घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.