Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज, संवर्धन प्रक्रिया फेल ?

अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज, संवर्धन प्रक्रिया फेल ?
, सोमवार, 29 मे 2017 (11:27 IST)

करवीरनिवासिनी अंबाबाईच्या मूर्तीची पुन्हा झीज होत आहे. दोन वर्षांपूर्वी अंबाबाईच्या मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. पण ती प्रक्रिया कुचकामी ठरली का काय? असा सवाल भक्त विचारत आहेत.

मंदिरातील देवीची मूर्ती दोन हजार वर्षांपूर्वीची असल्याची आख्यायिका आहे. त्यामुळं मूर्तीची झिज होत असल्याचं लक्षात येताच पुरातत्व खाते आणि पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं 2015 साली मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यात आली होती. त्यानंतर पुढच्या 100 वर्षात मूर्तीला काही होणार नाही, असा दावाही करण्यात आला होता. पण आता या मूर्तीवर पांढरे डाग दिसू लागले आहेत आणि रासायनिक थरही निघत आहे. त्यामुळे संवर्धन प्रक्रियेबद्दल चर्चा सुरू झाली आहे.

 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नक्षलवाद्यांकडून अक्षयकुमार आणि सायनाला धमकी